शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

विनादरवाजांचे कोंडवाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:22 IST

भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनावरांना पकडून कोंडण्यासाठी महापालिकेकडे दोनच कोंडवाडे आहेत. त्यातही, एकच कोंडवाडा कार्यरत आहे तर दुसरा मद्यपींसाठी अड्डा बनलेला आहे. वास्तविक शहरातील सहाही विभागांकरिता प्रत्येकी एक कोंडवाड्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्षच दिलेले नाही. मोकाट जनावरे पकडण्याचे अर्थकारणही संशयास्पद आहे.

स्टिंग आॅपरेशनधनंजय वाखारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनावरांना पकडून कोंडण्यासाठी महापालिकेकडे दोनच कोंडवाडे आहेत. त्यातही, एकच कोंडवाडा कार्यरत आहे तर दुसरा मद्यपींसाठी अड्डा बनलेला आहे. वास्तविक शहरातील सहाही विभागांकरिता प्रत्येकी एक कोंडवाड्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्षच दिलेले नाही. मोकाट जनावरे पकडण्याचे अर्थकारणही संशयास्पद आहे. मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार महापालिका दरवर्षी ठेका देण्याची औपचारिकता पूर्ण करते, ठेकेदार जमेल तसे मोकाट जनावरे पकडतो, कोंडवाड्यात टाकतो, पकडलेल्या जनावरांना पशुपालक सोडवून नेतात, काही मालक दंडाची रक्कम भरतात तर काही ठेकेदाराला दमदाटी करत जनावर घेऊन जातात. पुन्हा दुसºया दिवशी तीच जनावरे रास्ता रोकोसाठी सज्ज. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. महापालिकेचे शहरात केवळ दोनच कोंडवाडे आहेत. एक कोंडवाडा पंचवटी विभागात महापालिकेच्या भांडाराच्या पाठीमागे आहे, तर दुसरा सातपूर विभागात अग्निशमन दलाच्या जवळ आहे. सातपूर विभागातील कोंडवाड्याचा वापरच होताना दिसून येत नाही. त्याठिकाणी जनावरांपेक्षा मोकाट मद्यपींचा अधिक वावर असतो. हा कोंडवाडा जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी एका संस्थेला दिल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याठिकाणी तशी काही व्यवस्था चालते, याचा मागमूसही दिसून आला नाही. सद्यस्थितीत पंचवटीतीलच कोंडवाड्याचा वापर होताना दिसून येतो. याठिकाणी, मोकाट जनावरांना पकडून आणण्यासाठी छोटा टेम्पो आहे. ठेकेदाराकडून प्रामुख्याने, सकाळी दोन तासांतच दोन-चार जनावरे पकडून आणण्याचे काम केले जाते. दिवसभर टेम्पो कोंडवाड्याजवळच पडून असतो. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ठेकेदाराकडून पकडून आणलेल्या जनावरांची संख्या होती ४७८. म्हणजेच दरमहा ४० जनावरे तर प्रतिदिन एक ते दोन जनावरांचा हिशेब होतो. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी भटकताना दिसत असताना कोंडवाड्यात दिवसाला दोन-तीन जनावरे दिसून येतात. त्यातच ठेकेदाराकडून पंचवटी परिसरातील जवळपासचीच जनावरे पकडून आणली जातात. सिडको, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील मोकाट जनावरे मोकाटच असतात. त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. कुणी तक्रार केली तरच जनावर उचलले जाते. त्यामुळे शहरात ठेकेदार एक पण मोकाट जनावरे हजार असल्याने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ठेका देण्याची आवश्यकता तर आहेच शिवाय, प्रत्येक विभागात एक कोंडवाडा उभारण्याची गरज आहे.  महापालिकेने नावापुरता ठेका दिला आहे. परंतु, त्याच्याकडून प्रभावी असे कामकाज होताना दिसून येत नाही. या ठेक्यामागे शहराची समस्या सोडविण्यापेक्षा अर्थकारणच अधिक  दडलेले दिसते. त्यामुळे या प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.गोशाळेतील जनावरांचा संशयास्पद व्यवहार?महापालिकेकडून ठेकेदाराला निश्चित केलेल्या दरानुसार प्रति जनावर रक्कम मोजली जाते. ठेकेदाराने जनावर पकडून आणल्यानंतर जनावराच्या खाण्याचाही खर्च करायचा आहे. तो खाणावळ खर्चही महापालिकेकडून दिला जातो. जनावर पकडून आणल्यानंतर जास्तीत जास्त दहा दिवसांपर्यंत कोंडवाड्यात ठेवण्याची मुभा आहे. जनावराचा मालक न आल्यास सदर जनावर हे गोशाळेत सांभाळण्यासाठी जमा केले जाते. परंतु, जमा केलेल्या जनावराचे पुढे नेमके काय होते, याची तपासणी करणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामागेही मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. वास्तविक संबंधित गोशाळा चालविणाºया संस्थेने जनावरांची विक्री अथवा त्यांचा व्यवसाय करू नये, या अटीवर जनावरे सांभाळण्यासाठी दिली जातात. नेमके त्याचे पालन होते आहे काय? मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दरमहा आॅडिट होण्याची गरज आहे.मोकाट जनावरे रस्त्यांवर का दिसतात?मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेमार्फत ठेका दिला असतानाही दरदिवशी मोकाट जनावरे ठिकठिकाणी मोठ्या संख्येने ठिय्या मांडून बसलेली दिसून येतात. जनावरे रस्त्यांवर मोकळी सोडून देण्यामागेही काही व्यवहार दडला आहे काय, याचीही तपासणी होण्याची गरज निर्माण झालेली आहे. जनावरे मोकळी सोडून द्यायची, ठेकेदाराने ती पकडून नेऊन कोंडवाड्यात टाकायची, मालक आला नाही म्हणून ती गोशाळेत पाठवायची आणि गोशाळेतून ती परत रस्त्यांवर पाठवायची, असा काही व्यवहार तर होत नाही ना, याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. महापालिकेच्या महासभा व स्थायी समितीच्या सभांमध्ये मोकाट जनावरांच्या उच्छादाबद्दल सदस्य तक्रारी मांडताना दिसून येतात परंतु, रस्ता ते कोंडवाडा असा सारा प्रवास कशा प्रकारे चालतो, याचा कुणी गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसून आलेला नाही.