नाशिककरांना चाखयला मिळाला कोकण हापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 16:05 IST2018-05-20T16:05:56+5:302018-05-20T16:05:56+5:30
नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले.

नाशिककरांना चाखयला मिळाला कोकण हापूस
नाशिक : नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले. कोकणची ओळख असलेल्या हापूसचा प्रामुख्याने समावेश असलेल्या आंबा महोत्सवाला नाशिककरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पणन मंडळाच्या नाशिक शाखेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहाच्या आवारात मंगळपारपासून सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा रविवारी (दि.20) समारोप झाला. अशाप्रकारे शासकीय यंत्रणोमार्फत नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित आंबा महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोकणातून नाशिकमध्ये आबा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांनीही समाधान व्यक्त केले असून अशाप्रकारे दरवर्षी आंबा महोत्सवाचे नियोजन होण्याची गरज कोकणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
त्यामुळेच रविवापर्यंत चालणाऱ्या महोत्सवात बहूंतांश शेतकऱ्यांचे आंबे शनिवारपर्यंत सपल्याचे दिसून आले. या आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, राजापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे उपलब्ध असल्याने नाशिककरांची या आंब्याना चागलीच पसंती मिळाली. आंबा महोत्सवात 300ते 700रुपये डजनापासून आकारानुसार तीन ते पाच डझनाची लाकडी पेटी 2 हजार रुपयांपासून मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी थेट पेटीच खरेदी करणो पसंत केले. त्यामुळे रविवापर्यंत चालणाऱ्या या आंबा महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा माल शनिवारीच संपल्याची माहिती पणन मंडळातर्फे देण्यात आली. दरम्यान, ग्राहकांचा ओघ पाहून काही शेतकऱ्यांनी रविवारी काही प्रमाणात नव्याने माल मागविल्याची माहीती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
20 लाख रुपयांंची उलाढाल
आंबा महोत्सवात सहभागी 14 शेतकऱ्यांचा जवळपास सर्व माल विकला गेल्याने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 लाख 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यत व्यावसाय झाला. त्यामुळे या आंबा महोत्सवात सुमारे 20 ते 21 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे.