मोठ्या भावाकडून लहान भावावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:50 IST2019-11-18T01:49:54+5:302019-11-18T01:50:50+5:30

पाटीलनगर येथे किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मोठ्या भावाने लहान भावावर धारदार चाकूने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुयश बाळासाहेब जाधव (३१) यास ताब्यात घेतले आहे.

Knockout from older brother to younger brother | मोठ्या भावाकडून लहान भावावर चाकूहल्ला

मोठ्या भावाकडून लहान भावावर चाकूहल्ला

सिडको : पाटीलनगर येथे किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन मोठ्या भावाने लहान भावावर धारदार चाकूने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुयश बाळासाहेब जाधव (३१) यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलनगर येथील कोठारी बंधू चौकात संशयित सुयश याने त्याचा लहान भाऊ ऋषिकेश जाधव (२९) याच्याशी ‘तू दारू पिऊन का आलास व घरात उशिरा का येतोस?’ या विषयावरून भांडण केले. दरम्यान, या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सुयश याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने ऋषिकेशच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात तो जखमी झाला असून, त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.

Web Title: Knockout from older brother to younger brother