किसान रेल जाणार मुजफ्फरपूरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:55 IST2020-08-14T00:55:10+5:302020-08-14T00:55:33+5:30
रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार किसान रेल ही पार्सल गाडी शुक्रवारपासून मुजफ्फरपूरपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

किसान रेल जाणार मुजफ्फरपूरपर्यंत
मनमाड : रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार किसान रेल ही पार्सल गाडी शुक्रवारपासून मुजफ्फरपूरपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांना सोयीनुसार जास्तीत जास्त माल पाठविता येणार आहे. या गाडीच्या वेळेमध्येही बदल करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
देवळाली ते मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी (क्र . ००१०७ डाउन) ही दर शुक्र वारी देवळाली स्टेशनहून सायंकाळी ६ वाजता प्रस्थान करून रविवारी सकाळी ३.५५ वाजता मुजफ्फरपूर रेल्वेस्थानकावर पोहोचेल.