शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

नाशिक महामॅरेथॉन : गुलाबी थंडीत धावपटूंमध्ये चांगलीच चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:55 IST

२१, १०, ५, ३ किलोमीटर अंतरापर्यंत नाशिककर स्वयंस्फूर्तीने उत्साहात धावताना पहावयास मिळाले. २१ आणि १० किलोमीटर अंतरापर्यंत धावलेल्या धावपटूंमध्ये चांगलीच चुरस दिसून आली

ठळक मुद्दे५ आणि ३ किलोमीटर अंतर केवळ ‘हौशी’ गटासाठी 'अच्छी सेहत चाहते हो, तो दौडना पडेगा' 

नाशिक : रविवारची (दि.१) गुलाबी थंडीची मजा लुटत हजारो अबालवृध्द नाशिककरांनी तितक्याच उत्साहात अन् जल्लोषात निरामय आरोग्याचा संदेश आपल्या धावण्यातून दिला. निमित्त होते, लोकमतच्या नाशिक महामॅरेथॉनचे. भल्या पहाटे ईदगाह मैदानावर रंगलेल्या ‘लोकमत नाशिक महामॅरेथॉन’च्या तीसऱ्यापर्वाचा एकच जल्लोष पहावयास मिळाला. वॉर्मअप अन् झुम्बा नृत्याने धावपटूंमध्ये उर्जा अधिकच संचारला होता. २१, १०, ५, ३ किलोमीटर अंतरापर्यंत नाशिककर स्वयंस्फूर्तीने उत्साहात धावताना पहावयास मिळाले. २१ आणि १० किलोमीटर अंतरापर्यंत धावलेल्या धावपटूंमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. उर्वरित ५ आणि ३ किलोमीटर अंतर केवळ ‘हौशी’ गटासाठी होता. यावेळी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानावर विजेत्या धावपटूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्रसिंह, सोनी गिफ्टचे नितीन मुलतानी, संयोजक रूचिरा दर्डा, आशिष जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांची लाभली उपस्थितीराजुरी स्टीलचे डिलर मनू चांदवानी, हेमंत कोठावदे, प्रकाश पटेल, एचडीएफसी होम लोन्स लिमिटेडचे व्यवसायवृद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, विपणन प्रमुख समीर दातरंगे, एसएमबीटीचे हर्षल तांबे, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे तांत्रिक संचालक अशोक थरानी, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले, विपणनप्रमुख प्रदीप जोशी, कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक देवेश कारडा, अपोलो हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी मेनन, अपोलोचे डॉ. मंगेश जाधव, सोनी गिफ्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, साक्षी अ‍ॅडव्हर्टायजिंगचे संचालक सचिन गिते, स्टर्लिंग मोटर्सचे महाव्यवस्थापक महेश राठी, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितीज अग्रवाल, वरुण अ‍ॅग्रोच्या संचालक मनीषा धात्रक आणि शशीकांत धात्रक, न्यूट्रिकेअरच्या रश्मी सोमाणी, गौरव सोमाणी, मधुर जयदेव गृह उद्योगचे संचालक धर्मेंद तरानी, जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रमुख आणि स्थायीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, रिलॅक्स झीलचे संजय पाटील, कोटक महिंद्राचे विभागीय व्यवस्थापक अंकित शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

ढोल पथकाच्या वादकांना शहनाईच्या सुरांचीही साथ महामॅरेथॉनच्या तीस-या पर्वात सहभागी धावपटूंचा उत्साह शिवताल ग्रुपच्या ढोलपथकाने सळसळता ठेवला. धावपटूंच्या स्टार्टलाईनपुढेच मार्गाच्या दुतर्फा उभे राहून वादकांनी नाशिक ढोलचा ताल धरत धावपटूंमध्ये अधिकच उर्जा भरली. तसेच ईदगाह मैदानावर पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस बॅन्डच्या वादकांनी देशभक्तीपर गीतांची धून वाजवित रंगत आणली. नाशिकचे वाद्य म्हणून ओळख असलेल्या नाशिक ढोलमुळे वातावरणात उत्साह अधिकच संचारला. ढोलचा नाद आसमंतात घुमू लागल्यावर स्पर्धकांमधील जोशात अधिकच भर पडल्याचे दिसून आले. ढोल पथकाच्या वादकांना शहनाईच्या सुरांचीही साथ यंदा लाभली.धावपटूंचा उत्साह शाळकरी मुलांनी वाढविलाधावपटूंना उत्साह वाढावा यासाठी मैदानापासून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी विविध शाळांच्या वाद्यपथकांच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाचे वादन केले. यामध्ये इस्पॅलियर इंग्लीश मिडियम, दिल्ली पब्लीक स्कूल, फ्रावशी अकादमी, किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, जेम्स इंटरनॅशनल स्कूल, रुद्र इंटरनॅशनल स्कूल, कोटक महिंद्र, एचडीएफसी होम लोन्ससह विविध शाळांनी सहभाग घेतला. नाशिकमधील अनेक शाळांचे विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना चीअर केले. प्रत्येक चौकात चीअर करणाºया विद्यार्थ्यांबरोबरच दरवर्षीप्रमाणे नाशिककरदेखील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांच्या उत्साहात भर घातली. त्याशिवाय कलापथक, मॅस्कॉटदेखील स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते.---'अच्छी सेहत चाहते हो, तो दौडना पडेगा' असा दिला संदेशलोकमत नाशिक महामॅरेथॉनसारख्या उपक्रमामुळे नाशिकच्या सुखद थंडीबरोबरच आल्हाददायक वातावरण, समृद्ध पर्यावरण, हेल्थसिटी म्हणून निर्माण होत असलेल्या नावलौकिकाला अधिक बळ मागील तीन वर्षांपासून मिळत आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्वच उद्योगांना पूरक असे नाशिकचे ब्रॅँडिंग करण्यातदेखील हा उपक्रम अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. नाशिककर आपल्या आरोग्याविषयी खूपच जागरूक आहे. यामुळे दरवर्षी लोकमत समुहाकडून पाच मोठ्या शहरांमध्ये आयोजन केल्या जाणाºया महामॅरेथॉनचा श्रीगणेशा पुण्यनगरी नाशिकमधूनच केला जातो. हे यंदाचे तीसरे वर्ष आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांचा उत्साह अधिक वाढलेला दिसून आला. संपुर्ण राज्याला नव्हे तर देशाला नाशिककरांनी ‘अच्छी सेहत चाहते हो, तो दौडना पडेगा’ असा संदेश दिला.- रूचिरा दर्डा, संयोजक, लोकमत महामॅरेथॉन

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिकHealthआरोग्य