येवला प्रांत कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:50+5:302021-07-07T04:17:50+5:30

शहरातील जुन्या पंचायत समिती कार्यालयापासून माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात ...

Kisan Sabha Morcha at Yeola Provincial Office | येवला प्रांत कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

येवला प्रांत कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

शहरातील जुन्या पंचायत समिती कार्यालयापासून माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रांत कार्यालय परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार गावीत, धर्मराज शिंदे, हनुमंत गुंजाळ यांची भाषणे झाली. यावेळी प्रांताधिकारी सोपान कासार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या नावाखाली सरकारने चालढकल करत वनजमीनधारकांचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. वनजमीनधारकांच्या ताब्यातील क्षेत्रात वनविभागाकडून दडपशाही सुरू आहे. जबरदस्तीने वनजमिनीत चार्‍या खोदण्याचे काम केले जात आहे. चार्‍या खोदण्याचे काम तत्काळ बंद करण्यात यावे, वनजमीनधारकांना पेरणी करण्यास अटकाव करू नये, वनजमीन कसणार्‍यांच्या नावे वनजमीन करण्यात यावी, यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात हनुमान गुंजाळ, विजय दराडे, त्र्यंबक ठाकरे, तुकाराम गायकवाड, शब्बीर सय्यद, उखाजी माळी, शांताराम दळवी, भाऊसाहेब मोरे, शंकर पिंपळे, विजय दराडे, गोरख वाघ, मधुकर मांजरे, गोरख निकम आदींसह किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

फोटो- ०५ येवला किसानसभा

येवला येथे किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा.

050721\05nsk_40_05072021_13.jpg

फोटो- ०५ येवला किसानसभायेवला येथे किसानसभेच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा. 

Web Title: Kisan Sabha Morcha at Yeola Provincial Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.