किसान रेल्वेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:34 IST2020-09-23T23:39:33+5:302020-09-24T01:34:34+5:30
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने शेतक-यांच्या मागणीचा विचार करून देशातील पहिली देवळाली- मुजफ्फरपुर किसान पार्सल रेल्वेला चांगला दिसत असल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत किसान रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

किसान रेल्वेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने शेतक-यांच्या मागणीचा विचार करून देशातील पहिली देवळाली- मुजफ्फरपुर किसान पार्सल रेल्वेला चांगला दिसत असल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत किसान रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
देशातील पहिली देवळाली- मुजफ्फरपुर किसान पार्सल रेल्वे 7 आॅगस्टला सुरु करण्यात आली. किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. किसान रेल्वे ही गाड़ी आठवड्यातून तीन दिवस चालवली जात आहे. लासलगाव येथे तिला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी देवळाली स्थानकातून 18.00 वाजता गाडी सुटते. मुजफ्फरपुरहून ती सोमवार, गुरुवार, शनिवार देवळालीकडे प्रस्थान करते. शेतक-यांनी माल पॅक करून हा आपल्या जवळच्या पार्सल आॅफिसमध्ये आणावा. सोबत आधारकार्डची झेरॉक्स आणावी. शेतकरी, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना मुख्य रेल्वे पार्सल पर्यवेक्षकाकडे संपर्क करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.