नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:54 IST2018-09-05T15:53:33+5:302018-09-05T15:54:01+5:30
नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तनपदधतीनुसार झालेल्या निवडणूक अधिकारी सरपंच रेणूका पावडे यांच्या अध्यक्षतेखालीही निवड करण्यात आली.

नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे
नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तनपदधतीनुसार झालेल्या निवडणूक अधिकारी सरपंच रेणूका पावडे यांच्या अध्यक्षतेखालीही निवड करण्यात आली.
नांदगाव बुद्रुक येथे आज ( दि.४) रोजी माजी उपसरपंच कमल पागेरे यांच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली.सरपंच रेणूका पावडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. किरण पागेरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी सरपंच रेणूका पावडे यांनी उपसरपंचपदी पागेरे यांची बिनविरोध निवड केली.
याप्रसंगी वसंत मुसळे, बन्सी पागेरे, मोहन झोमान, विठोबा संधान, सुनील पागेरे, संगीता पाळदे, गणेश नाडेकर, मंगेश पगारे, रेखा पगारे, दत्तु मुसळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--