त्र्यंबकेश्वर जवळील किकवी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:05 IST2021-06-29T22:46:19+5:302021-06-30T01:05:42+5:30
त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.

त्र्यंबकेश्वर जवळील किकवी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता
त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.
२००८/०९ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरुवात झाली व सन २०१३ मध्ये किकवी प्रकल्पास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर आलेल्या किकवी प्रकल्प मागे पडला. आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजुर केला होता. आणि आता आघाडी सरकारनेच किकवी प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येत आहे. ब्राम्हणवाडे आदी गावांच्या शिवारात सन २००९ पासुन मंजुर झालेला किकवी प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेतुन लवकरच सही सलामत सुटून कामाची मुहुर्तमेढ रोवली जाणार असल्याचे संकेत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.
या प्रकल्पासाठी सुमारे ११५० कोटी रुपये मंजुर होण्याची अपेक्षा असल्याचे समजते. तसे पाहता हा प्रकल्प अगोदरच मार्गी लागला असता. पण जमिनी अधिग्रहण करतांना वन विभाग व जमिन मालक यांच्या जमिनीच्या मोबदल्यावरुन झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते, आता ती केस निल होण्याची शक्यता आहे. तथापि न्यायालयीन प्रक्रियेतून सुटल्यावर प्रकल्प मार्गी लागणार असे लोकमतशी बोलताना खोसकर म्हणाले.
सुरुवातीला प्रकल्पाचा निम्मा निधी नाशिक मनपाने करावा असे ठरले होते पण नंतर मनपाने नकार दिला. या प्रकल्पास १०० टक्के निधी शासनाने खर्च करावा असे सुचवले. आणि आता हा प्रकल्प लवकरच साकारणार आहे. या प्रकल्पामुळे कुठलेच गाव विस्थापित होणार नसले तरी शिरसगाव जवळील जव्हार हायवे पाण्याखाली जाईल. त्यामुळे रस्ता सापगावातुन जाण्याची शक्यता आहे. इतक्या दिवस सरकारी लालफितीत अडकलेला किकवी प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे, असे खोसकर यांनी सांगितले.