सिडकोतून अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:55 IST2019-07-20T00:54:56+5:302019-07-20T00:55:58+5:30
स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडकोतून अल्पवयीन मुलाचे अपहरण
सिडको : स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदनगर परिसरातील एकता चौक भागातून प्रथमेश श्यामसुंदर जगताप (१७) याचे गुरु वारी (दि.१८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी प्रथमेशला काहीतरी आमिष दाखवून त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद प्रथमेशचे वडील श्यामसुंदर रामदास जगताप (४३) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.