अल्पवयीन मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:34 IST2019-02-06T01:33:36+5:302019-02-06T01:34:45+5:30
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जनार्दननगर येथील नांदूर गाव परिसरातून पीयूष नारायण भदरगे (१२) या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलाचे अपहरण
नाशिक : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जनार्दननगर येथील नांदूर गाव परिसरातून पीयूष नारायण भदरगे (१२) या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्याच्या पालकांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
गेल्या शनिवार (दि.२) पासून पीयूष भदरंगे हा बेपत्ता झाला असून, या प्रकरणी सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुलाचे वडील नारायण भदरगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.