शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या २४ तासांत अपहृत मुलाचा शोध

By admin | Updated: October 26, 2016 00:06 IST

थरारनाट्य : विवाहासाठी दिलेले पैसे मिळत नसल्याने केले अपहरण

नाशिक : तीन वर्षांपूर्वी मित्राला विवाहासाठी दिलेले उसनवार पैसे परत मिळत नसल्याने त्याचा दीड वर्षीय मुलगा ‘अथर्व’चे अपहरण केल्याची घटना जेलरोडवरील एमएसईबी कॉलनीत घडली होती़ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या अपहृत मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी सोमवारी (दि़२४) पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी संशयित किशोर बाळासाहेब गोडसे (२५, रा. संसरीगाव) यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित किशोर गोडसे व सतीश विध्वंस हे दोघे मित्र आहेत़ २०१३ मध्ये किशोर याने सतीशला विवाहासाठी ४० हजार रुपये उसनवार दिले होते़ सतीशने हे पैसे जसजसे येतील तसतसे परत करावे, असे ठरले होते़ मात्र, गत तीन महिन्यांपासून किशोर हा रात्री-अपरात्री पैसे मागण्यासाठी घरी येत होता़ मात्र पैसे नसल्याने सतीश ते देण्यास असमर्थ होता़  शुक्रवारी (दि़२१) रात्री आठ वाजेच्या सुमारास किशोर हा नेहमीप्रमाणे पैसे मागण्यासाठी गेला असता सतीशची पत्नी आपल्या दीड वर्षाचा मुलगा अथर्वला बाहेर खेळवत होती़ अथर्वला चॉकलेट घेऊन देतो असे सांगून किशोर घेऊन गेला तो परत आलाच नाही़ त्यामुळे सतीश व त्याची पत्नी या दोघांनीही बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला, मात्र हे दोघेही न सापल्याने शनिवारी (दि़२२) उपनगर पोलीस ठाणे गाठून अथर्वचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली़ पोलिसांनी या तक्रारीची तत्परतेने दखल घेत शहरातील नाशिकरोड, सीबीएस, त्र्यंबेकश्वर, पंचवटी, तपोवन, सोमेश्वर अशा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र किशोर सापडला नाही़ त्यात रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास संशयित किशोरने सतीशला फोन करून बँक खात्यात ६५ हजार रुपये जमा न केल्यास अथर्व परत मिळणार नाही, अशी धमकी दिली़ विध्वंस दाम्पत्याने ही बाब पोलिसांना सांगताच सायबर क्राइम लॅबची मदत घेऊन त्याचा शोध घेण्यात आला़ मात्र किशोरने ज्या मोबाइलवरून फोन केला तो मोबाइल एका मुलाचा होता व त्यास याबाबत माहिती नव्हते़पोलिसांनी पुन्हा शहरातील विविध ठिकाणी शोध घेतला मात्र किशोर व अथर्व हे सापडले नाही़ अखेर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकाबाहेरील अंधारात संशयित किशोर आणि अथर्व हे दोघेही बसलेले असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन अथर्वला आई-वडिलांकडे सुपूर्द केले़ ही कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराव, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, साळवे, पोलीस हवालदार शिंदे, मांदळे, गवांदे, भावले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली़ (प्रतिनिधी)