राज्यस्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धेत खिरकडेचा संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:17 IST2020-12-15T17:13:34+5:302020-12-15T17:17:23+5:30
पेठ : कणसरा माता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पेठ तालुक्यातील खिरकडे येथील संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

राज्यस्तरीय व्हाॅलीबॉल स्पर्धेत खिरकडेचा संघ प्रथम
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून जवळपास ६६ संघ सहभागी झाले होते. साकूर विरुद्धच्या अंतिम सामन्यात खिरकडे संघाने उत्तम खेळ करीत प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी भागातील खिरकडे या छोट्याशा गावातील संघाने अव्वल स्थान पटकावल्याबद्दल या संघाचे जिल्हास्तरातून अभिनंदन केले जात आहे.