इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील आदिवासी लाभार्थींना खावटीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:02 IST2021-07-17T17:28:04+5:302021-07-18T00:02:14+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरात शासनाच्या धोरणानुसार व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते या योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थी कुटुंबियांना देण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील आदिवासी लाभार्थींना खावटीचा लाभ
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरात शासनाच्या धोरणानुसार व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते या योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थी कुटुंबियांना देण्यात आला.
काळुस्ते येथे झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार खोसकर यांच्या समवेत माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, ॲड. संदिप गुळवे, आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गुजर, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, माजी सभापती गोपाळा लहांगे, रामदास धांडे, पं. स. सदस्य विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर कडू, बाळासाहेब लंगडे, अरुण गायकर, बाळासाहेब गाढवे, पांडूरंग शिंदे यांच्यासह सरपंच वनिता गवारी, यशवंतराव घारे, गंगाराम घारे, कैलास घारे, कविता खाडे, खंडू खोकले, मुख्याध्यपक फुंदे, रामकृष्ण घारे, शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
आदिवासी समाजाला खावटीसाठी लाभार्थी निवड करताना शासनाने अल्पभुधारक, अत्यल्पभुधारक, म.ग्रा.रो.ह.यो.मजुर असे नियम निकष बाळगून लाभार्थी निवड केलेली आहे. मात्र अद्यापही अनेक भूमीहीन, प्रकल्पग्रस्त व गरजु आदिवासींना लाभ मिळालेला नसुन या बाबत शासनदरबारी पाठपुरावा करून सरकारदरबारी विषय मांडुन वंचित राहिलेल्या सर्वांना लाभ मिळवुन देणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.