चिंचोले येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:59 IST2019-04-02T17:58:40+5:302019-04-02T17:59:51+5:30

चांदवड : तालुक्यातील चिंचोले येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी १० वाजता घटस्थापना करण्यात आली.

 Khanderao Maharaj Yatra started at Chinchole | चिंचोले येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

चिंचोले येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

चिंचोले येथे खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते. यात्रोत्सव काळात विविध ठिकाणच्या वाघे-मुरळींचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होतात. शनिवारी काठी व रथ मिरवणूक तसेच सायंकाळी ५ वाजता चिंचोले येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर भिकाजी जाधव यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गोपीनाथ जाधव यांच्यातर्फे गावकऱ्यांना महाप्रसाद व भंडारा वाटप करण्यात येणार आहे. रहाडी व लंगर तोडून कार्यक्र माची सांगता होणार आहे. चांदवड तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने बारागाड्या ओढण्याच कार्यक्रम पाहण्यासाठी हजेरी लावतात. यात्रोत्सव काळात भाविकांची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी धोंडीराम जाधव, गोपाळ गायकवाड, मधुकर जाधव, सुधाकर जाधव, वाळू जाधव, तुकाराम जाधव, संदीप जाधव, भास्कार जाधव, रोहिदास जाधव, आत्माराम अहेर, तुकाराम जाधव, तान्हाजी जाधव, ज्ञानेश्वर भवर, अरुण जाधव, जयराम जाधव, नवनाथ अहेर यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

Web Title:  Khanderao Maharaj Yatra started at Chinchole