निफाडला आजपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:33 IST2019-02-19T01:32:45+5:302019-02-19T01:33:04+5:30
निफाड : येथील ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सव मंगळवार (दि.१९) रोजी आयोजित केला असल्याची माहिती श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष भगवान गाजरे यांनी दिली

निफाडला आजपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव
ठळक मुद्देखंडेराव महाराज चांदीचा टाकची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
निफाड : येथील ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सव मंगळवार (दि.१९) रोजी आयोजित केला असल्याची माहिती श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष भगवान गाजरे यांनी दिली निफाड नगरपंचायत आणि यात्रोत्सव कमिटी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी करणार आहे. खंडेराव महाराज रथाचा लिलाव महेश जंगम यांनी घेतला. मंगळवारी होम-हवन, मांडव डहाळे, खंडेराव महाराज पादुका, कावडीची मिरवणूक, खंडेराव महाराज चांदीचा टाकची मिरवणूक काढण्यात येणार आहे.