खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:18 IST2019-12-12T18:17:31+5:302019-12-12T18:18:38+5:30

पिंपळगाव वाखारी येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.

 Khanderao Maharaj Yatra festival celebrations | खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

पिंपळगाव वाखारी : येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषात बारा गाड्या ओढून पंचक्र ोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला.
सालाबादप्रमाणे यंदाही पिंपळगाव वाखारी येथे गावाच्या पूर्व व दक्षिण दिशांनी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म खंडू सुर्यवंशी व संदीप सोनवणे या मल्हार भक्तांनी पार पाडला.
रात्री लोकनाट्य तमाशा झाला.मल्हार भक्तांनी रात्रभर जागरण केला. कुस्त्यांची दंगल झाली. जिल्ह्यातील नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली. महिला मल्लांनी विशेष उपस्थिती लावली व अनेक कुस्ती करून भविष्यात महिला कुस्तीला भविष्य असल्याचे दाखवले.
यावेळी सरपंच बायटा जाधव, उपसरपंच श्रावण थोरात, निदश थोरात, ग्यानदेव वाघ, दिलीप पाटील, यशवंत खैरनार, विलास सोनजे यांनी विशेष परिश्रम
घेतले. कुस्ती पंच म्हणून
लक्ष्मीकांत पाटील, निलेश पाटील,संजय कदम, पप्पू वाघ यांनी काम पाहिले.

Web Title:  Khanderao Maharaj Yatra festival celebrations