खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:55 IST2020-02-11T15:55:05+5:302020-02-11T15:55:39+5:30

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे.

 Khanderao Maharaj started the journey | खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ

खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मल्हारी नावावरूनच गावाचे नाव मºहळ झाले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. माघ पौर्णिमेपासून चार दिवस यात्रा भरते. त्यासाठी परिसरातील भाविक हजेरी लावतात. शिवाय नोकरी व्यवसायनिमित्त मुंबई व बाहेरगावी गेलेले मूळचे ग्रामस्थही यात्रेसाठी सुट्टी घेऊन मुद्दाम गावी येतात. पांगरी गावास यात्रेचा मान असून, रथ येईपर्यंत कोणत्याही धार्मिक विधीस आरंभ होत नाही. आकर्षक रोषणाई केलेला रथ पांगरी येथून मºहळ येथे दिमाखात जातो. दरवर्षी एका कुळास त्याचा मान दिला जातो. त्यात पांगारकर, धाकटे पगार, थोरले पगार, निरगुडे-दळवी, पाथरवटसमाज व बारा बलुतेदार यांना हा मान आलटून पालटून दिला जातो. यावर्षी थोरले पगार यांना मान असून, प्रभाकर पगार यांचा हस्ते रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातून (रविवारी) रथाची मिरवणूक काढून हा रथ येथून तीन किलोमीटर असलेल्या दर्पात नेण्यात आला. तेथे पूजा व तळी भरण्यात आली. त्यानंतर रात्रभर येथे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी परत रथाची गावातून मिरवणूक काढून रथ मºहळकडे रवाना झाला.

Web Title:  Khanderao Maharaj started the journey

टॅग्स :Nashikनाशिक