पाडळी देशमुखच्या सरपंचपदी खंडेराव धांडे बिनविरोध
By Admin | Updated: May 7, 2014 21:26 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:26:12+5:30
मुकणे : पाडळी देशमुख (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव धांडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

पाडळी देशमुखच्या सरपंचपदी खंडेराव धांडे बिनविरोध
मुकणे : पाडळी देशमुख (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव धांडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खंडेराव धांडे यांच्या नेतृत्वखालील पॅनलने विजय मिळवला होता. नियोजित वेळेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस. बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी बी. व्ही. रिकामे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सरपंचपदासाठी खंडेराव धांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने बी. एस. बोरसे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. नवनिर्वाचित सदस्य हौसाबाई धांडे, लीलाबाई धोंगडे, कैलास धांडे, रतन धांडे, सीताबाई धांडे आदि सदस्य हजर होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच पोपट धांडे, पांडुरंग धांडे, तानाजी धोंगडे, जयराम धांडे, दामू पा. धांडे, विष्णुपंत धांडे, रामदास जाधव, भगवान धांडे, नंदू धांडे, पांडुरंग घाटेसाव, कृष्णा चौधरी, बजरंग वारुंगसे, बाळासाहेब आमले, बाबूराव वारुंगसे, रामभाऊ धोंगडे, बाबूराव गोंडके, गणेश धांडे, किरण धोंगडे, भाऊसाहेब धोंगडे, बाळासाहेब धांडे, उत्तम धांडे, दिनेश धोंगडे, दिलीप धांडे, ग्रामसेवक जाधव आदिंसह उपस्थित होते.