महापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालय; शुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:21 AM2017-12-12T01:21:10+5:302017-12-12T01:24:04+5:30

नाशिक : शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करून देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे. या निवासी केंद्रीय विद्यालयामुळे महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

Kendriya Vidyalaya will get NMC; Gospel: Three schools surveyed by the Central team | महापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालय; शुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

महापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालय; शुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

Next
ठळक मुद्देमहापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालयशुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

नाशिक : शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करून देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे. या निवासी केंद्रीय विद्यालयामुळे महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर नाशिक दौºयावर आले असता, त्यांच्यापुढे बंद पडत चाललेल्या महापालिका शाळांबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. यावेळी महापालिकेला केंद्रीय विद्यालय देता येईल काय, याची चाचपणी जावडेकर यांनी केली होती. त्यानुसार, चार जणांचे पथक सुरुवातीला नाशिक दौºयावर आले होते तर गेल्या शनिवारी (दि.९) उपसंचालकांसह आणखी चौघांचे पथक नाशिकला येऊन गेले.
सदर पथकाने महापालिकेच्या बी. डी. भालेकर हायस्कूल, मोटकरवाडी येथील शाळा क्रमांक ६६ आणि जेतवननगर येथील शाळा क्रमांक ११० या शाळांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, पथकाने शाळांची इमारत, तेथील वर्गखोल्या, त्यांची लांबी-रुंदी, शाळांचे प्रांगण, मुला-मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह, शाळांमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधा यांची बारकाईने तपासणी केली. सदर शाळांच्या मुख्याध्यापकांकडून त्यासंबंधीचा छायाचित्रांसह अहवालही मागविण्यात आला. त्यानुसार, वडनेर दुमाला येथील केंद्रीय विद्यालयात महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी केंद्रीय पथकासमोर अहवालाचे सादरीकरण केले. कसे असेल केंद्रीय विद्यालयकेंद्रीय विद्यालय हे पूर्णपणे निवासी असणार आहे. या विद्यालयात अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा असतील. सदर विद्यालयासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकेल शिवाय, प्रशिक्षित शिक्षकवर्गही उपलब्ध होईल. मनपा शाळांमध्ये जे विद्यार्थी स्कॉलर असतील, शिष्यवृत्तीधारक असतील अशा मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या विद्यालयातून मुलांची स्पर्धा परीक्षांविषयकही तयारी करून घेतली जाणार आहे.

Web Title: Kendriya Vidyalaya will get NMC; Gospel: Three schools surveyed by the Central team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा