‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:32 IST2020-08-19T14:30:40+5:302020-08-19T14:32:05+5:30
पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आहे.

‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’
ठळक मुद्देपिंपळगाव निसर्गपेमीचा असा संदेश
पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आहे.
बैल पोळा या सणाच्या दिवशी पिंपळगाव बसवंत येथील कलाकार विष्णू जठार यांनी परिसरातील जुना आग्रा महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला आपल्या कलाकृतीने हुबेहूब बैलाचे चित्र काढून त्याचे रंगरंगोटी करून एक वेगळ्या प्रकारे बैलपोळ्याच्या सणानिमित्त ‘झाडे जगवा’ व त्या ‘झाडाचे सौंदर्य टिकावा’ असा संदेश दिला आहे.