शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

संवेदना जागृत ठेवून कर्तव्य करा : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:55 AM

सामान्य माणसाचे रक्षण हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य करा, गुन्हेगारांवर जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ कर्तव्य करताना संवेदना जागृत ठेवण्यास जबाबदारी आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़

ठळक मुद्देदीक्षान्त समारंभ : पोलीस उपनिरीक्षक ११५ वी तुकडी

नाशिक : सामान्य माणसाचे रक्षण हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य करा, गुन्हेगारांवर जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ कर्तव्य करताना संवेदना जागृत ठेवण्यास जबाबदारी आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या शुक्रवारी (दि़ ५) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११५व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी राजेश जवरे यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थीचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़ फडणवीस पुढे म्हणाले की, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पालन महत्त्वाचे आहे. ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी. तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल.प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी प्रास्ताविक केले. या दीक्षान्त समारंभाच्या संचलनाचे नेतृत्व कुणाल चव्हाण व राजेश जवरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, डॉ. रणजित पाटील (गृह राज्यमंत्री- शहरे) , दीपक केसरकर (गृह राज्यमंत्री- ग्रामीण), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, सहसंचालक संजय मोहिते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.नाशिकच्या कुणाल चव्हाण यांना तीन पुरस्कारनाशिक जिल्ह्यातील कुणाल चव्हाण यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचे तीन पुरस्कार मिळविले़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सर्वोत्कृष्ट फिजिकल ट्रेनिंग, ड्रिल व उत्कृष्ट गणवेश पुरस्कार प्रदान करण्यात आला़एमपीएतील सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटनमहाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी परिसरातील खुले सभागृह व सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले़ महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने तयार केलेले खुले सभागृह ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे़ तर सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले असून, ४१ कोटी ८७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे़ खुले सभागृह प्रशिक्षणार्थींना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तर सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहे़

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस