रेल्वे व्यवस्थापकपदी केडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:24 IST2021-08-13T01:23:44+5:302021-08-13T01:24:05+5:30
भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून आयआरएसई अधिकारी एस. एस. केडिया यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

रेल्वे व्यवस्थापकपदी केडिया
नाशिक रोड : भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून आयआरएसई अधिकारी एस. एस. केडिया यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. केडिया यांनी गोरखपूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेऊन १९८९ मध्ये गोल्ड मेडल मिळवले. नंतर ते १९९० मध्ये रेल्वे सेवेत रुजू झाले. झांसी आणि नागपूर विभाग, मुंबई उपनगरे, मध्य रेल्वे मुख्यालयाच्या दक्षता विभागात काम केले. त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले. त्यांनी कॅनडा, लंडन, इटलीचा अभ्यास दौरा केला आहे. त्यांना रेल्वे ट्रॅक, पूल आणि इमारतींचे बांधकाम यांचा तसेच बेलापूर सीवूड-अर्बन लाइन, परेल टर्मिनस आदी मोठ्या प्रकल्पांचा त्यांना अनुभव आहे.
(फोटो १२ केडीया)