काजीसांगवीच्या तरुणाचा तळ्यात पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:12 IST2021-04-17T21:06:32+5:302021-04-18T00:12:17+5:30
काजीसांगवी : येथील २२ वर्षीय युवकाचा तळ्यात पडून मृत्यू झाला.

काजीसांगवीच्या तरुणाचा तळ्यात पडून मृत्यू
ठळक मुद्दे तळ्यात झोक गेल्यामुळे तो पाण्यात पडला.
काजीसांगवी : येथील २२ वर्षीय युवकाचा तळ्यात पडून मृत्यू झाला.
कल्पेश नंदू मेचकुल (२२)रा. काजीसांगवी हा स्वत:च्या बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे तळ्यातील मोटर चालू करण्यासाठी गेल्यानंतर त्याचा तळ्यात झोक गेल्यामुळे तो पाण्यात पडला. त्यास बाहेर काढून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेमुळे काजीसांगवी गावावर शोककळा पसरली आहे.