शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

संरक्षित वास्तू काझी गढीचे घोंगडे ‘भीजतच....’

By अझहर शेख | Published: July 03, 2019 3:54 PM

दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये गढीचा भाग ढासळत असतो. निम्यापेक्षा अधिक गढी ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चीला जातो, जसा पावसाळा येतो तसाच! पावसाळा संपला की, रहिवाशांसोबत प्रशासनाकडूनही सुटकेचा नि:श्वास सोडला जातो आणि हा प्रश्न पुन्हा पुढील पावसाळ्याच्या तोंडापर्यंत बासनात गुंडाळला जातो.

ठळक मुद्देगढीच्या संरक्षक भिंतीचे घोंगडे कायम २०१५ साली गढीचे माती परिक्षण संरक्षित जुनी मातीची गढी अर्थात काजी गढी असुरक्षित

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून पत्र पाठवून महापालिकेला काजी गढीच्या संभाव्य आपत्तीचे स्मरण करून दिले जाते. जणू ‘आला पावसाळा काजी गढी सांभाळा’ असेच प्रशासन एकमेकांना सांगू इच्छिते; मात्र मागील अनेक वर्षांपासून ‘भीजत’ पडलेले गढीच्या संरक्षक भिंतीचे घोंगडे कायम आहे.दरवर्षी पावसाळ्याची चाहूल लागली क ी जिल्हा प्रशासनाला काजी गढीच्या आपत्तीच्या धोक्याची आठवण होते आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यानुसार ‘खबरदारी घ्या..’ असे पत्र महापालिकेला पाठविले जाते. यावर्षीही हा ‘नियम’ पाळला गेला. त्यापलीकडे काजी गढीच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही उपाययोजना महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने धोकादायक गढीची सुरक्षितता अधांतरीच आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये गढीचा भाग ढासळत असतो. निम्यापेक्षा अधिक गढी ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चीला जातो, जसा पावसाळा येतो तसाच! पावसाळा संपला की, रहिवाशांसोबत प्रशासनाकडूनही सुटकेचा नि:श्वास सोडला जातो आणि हा प्रश्न पुन्हा पुढील पावसाळ्याच्या तोंडापर्यंत बासनात गुंडाळला जातो. गोदाकाठच्या दिशेने असलेल्या धोकादायक झालेल्या गढीच्या काठावर शितळादेवी मंदिराच्या पाठीमागून तर संत गाडगे महाराज स्मारकापर्यंत सुमारे दीडशे ते दोनशे लहानमोठी घरे आहेत. या घरांखालील माती पावसाळ्यात कधीही ढासळून घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली जाण्याचा धोका ओढवू शकतो; मात्र या संभाव्य आपत्तीविषयी महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाने फारसे गांभीर्याने अद्याप तरी घेतलेले नाही.काजी गढी ही संरक्षित वास्तू म्हणून केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केली आहे. या गढीवर वेळोवेळी यापुर्वी झालेल्या उत्खननामध्ये ताम्रपाशानयुगाचे पुरावे पुरातत्व विभागाला आढळून आले आहेत. ताम्रपाशान युगातील तीन कालखंड पुरातत्व खात्याने अभ्यासानुसार निश्चित केले आहेत. या संरक्षित वास्तूचे पुरातत्व विभागाच्या यादीत स्थान जरी असले तरी संरक्षित जुनी मातीची गढी अर्थात काजी गढी असुरक्षित झाली आहे. हा प्राचीन वारसा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. या गढीवर लोकवस्ती वाढल्याने गढी संरक्षित करण्याबाबत पुरातत्व खात्याकडून दुर्लक्ष केले गेले ते आजतागायत.माती परिक्षण, वास्तुविशारदाचा आराखडा शुल्क म्हणून वीस लाख रूपयांचा धनादेश जलसंपदा विभागाला महापालिकेकडून २०१६ साली दिला गेला आहे. सदर शुल्काची मागणी जलसंपदा विभागाने त्यावेळी महापालिकेकडे केली होती. याआधार राज्य शासनाकडून अंदाजे वीस कोटी रूपयांची रक्कम संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी मंजूर करून घेतली जाईल, असे त्यावेळी जलसंपदा विभागाकडून सांगितले गेले होते; मात्र त्यानंतर महापालिका, जलसंपदा, जिल्हा प्रशासन अशा सर्वच शासकिय यंत्रणांना विसर पडला तो कायमचाच. गढीचे माती परिक्षण २०१५ साली मेरी संस्थेमार्फत केले गेले होते. त्यानंतर वीस कोटी रूपयांचा खर्च भींतीच्या बांधकामासाठी येणार असल्याने तसा प्रस्तावदेखील शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला गेला होता; मात्र पुढे या सगळ्या बाबी लालफितीत अडकून पडल्या अन् गढीची सुरक्षा आजही वा-यावरच आहे.

या यंत्रणांचा असा येतो गढीशी संबंध-संरक्षित वास्तू : भारतीय पुरातत्व विभागपूररेषेतील वास्तू : महापालिका विभागनदीकाठालगतची वास्तू : जलसंपदा विभागनाशिकमधील टेकडी : जिल्हा प्रशासन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय