शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

काझी गढी ढासळली; तीन पूल पाण्याखाली

By admin | Updated: July 31, 2014 00:54 IST

संततधार : रहिवाशांच्या स्थलांतराची तयारी; जनजीवन झाले विस्कळीत

लातूर : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पेटला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी मुरुडमध्ये तर देवणीमध्ये धनगर समाजाने आपल्या शेळ्या-मेंढ्यासह तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले़ मुरूड : धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने धनगर समाजाच्या एस़टी़आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मुरूडमधील लातूर-बार्शीरोडवर रास्ता रोको करण्यात आला़ धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने एकत्र येवून समाजबांधवांची अहिल्याबाई होळकर चौकातून रॅली काढण्यात आली़ ही रॅली डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातून बसस्थानक परिसरात आल्यानंतर आरक्षणाच्या घोषणा देवून आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला़ ६५ वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला रास्ता रोका आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला़ या आरक्षणाला आदीवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे विरोध करीत असल्याने आंदोलनाच्या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला़ यावेळी प्रा़विष्णू गोरे, बल्लु महाराज, लक्ष्मीकांत तवले, राजाभाऊ सोनटक्के, फुलचंद हिंगले, बळी हिंगले, दादा हिंगले, मधुकर नायगावकर, गहिनाथ गावडे, कपिल पाटील, जगन्नाथ पडवडे, भजनदास बर्डे, बालाजी पाटील, हनुमंत खांडेकर, तुकाराम पाटील, गोविंद वाघे, जयराम हजारे, राम हजारे, येमेश हिंगले, अ‍ॅड़उल्हास बनसोडे, शहाजी बन्डे, नारायण भालेकर, मोहन बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़देवणी : देवणी येथील धनगर समाजातर्फे त्यांच्या विविध मागण्यासाठी शेळ्या-मेंढ्यासह तहसील कार्यालयावर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, सदरील जातीचा संवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे़ या मागण्यासाठी तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़ या निवेदनावर दादाराव तपसाळे, किशन कल्याणकर, नागप्पा कल्याणकर, पुंडलीक तपसाळे, विश्वनाथ म्हेत्रे, तातेराव सोनाळे, डिगंबर मिर्झापूरे, दत्ता कल्याणकर, गुणवंत कल्याणकर, धनराज मिर्झापूरे, महेश डोणगापूरे, सुनील रावणगावे, काशिनाथ सोनाळे, विश्वनाथ कल्याणकर, चंद्रकांत तपसाळे, गोविंद म्हेत्रे, रेवण कल्याणकर शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते़ (वार्ताहर)