Kate has been elected unopposed as the president of the Nashik Teachers' Society | नाशिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी बनकर उपअध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड
नाशिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी बनकर उपअध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड

ठळक मुद्देउपअध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड

पिंपळगाव बसवंत : नासिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर अँड नॉनटीचिंग एम्पलोयी कॉ- आप क्र ेडिट सोसायटी लि. नाशिक या सोसायटीच्या अध्यक्षपदी रामराव बनकर तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या नासिक कार्यालयात शिवदास सहाय्यक निबंधक अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक अध्यक्ष अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली.
सर्वप्रथम निवडणूक विषयानुसार चर्चा करून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. अध्यक्षपदासाठी रामराव बनकर यांचा एकमेव अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी अण्णासाहेब काठे यांचा देखिल एकमेव अर्ज असल्याने सभेचे अध्यक्ष पेरणा शिवदास अध्यासी अधिकारी यांनी अध्यक्षपदी रामराव बनकर तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब काटे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
याप्रसंगी शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे नानासाहेब देवरे मधुकर भदाणे इजी देवरे संस्थेचे व्यवस्थापक जयप्रकाश कुवर आदींसह संचालक भाऊसाहेब पाटील, संजय देवरे, अरुण पवार, भाऊसाहेब शिरसाट, बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर, संजय चव्हाण, दत्तात्रय आदिक, जिभाऊ शिंदे, हेमंत देशमुख, संजय देसले, राजेंद्र सावंत, बबलू गांगुर्डे, विजया पाटील, भारती पवार आदीउपस्थित होते.

(फोटो १२ राम बनकर )

Web Title: Kate has been elected unopposed as the president of the Nashik Teachers' Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.