गोदावरी जेसीसच्या अध्यक्षपदी कटारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:40 IST2018-11-20T22:48:05+5:302018-11-21T00:40:20+5:30
येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला.

गोदावरी ज्युनियर चेंबरच्या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षपदाची शपथ घेताना लोकेश कटारिया. समवेत भरत बजाज, सलीम शेख, अॅड. जयंत जायभावे, प्रमोद वाघ, योगेश गवांदे, प्रशांत खोडके आदी.
सातपूर : येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला.
सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, शशिकांत जाधव, झोन अध्यक्ष भरत बजाज, उपाध्यक्ष प्रशांत खोडके, प्रमोद वाघ उपस्थित होते. मावळते अध्यक्ष योगेश गवांदे यांनी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया तसेच सचिव ओम मालुंजकर सहसचिव प्रतिक महाजन, उपाध्यक्ष संदीप भोजणे, संचालक रवींद्र जगताप, सतीश वाघ, किरण सानप, आकाश पोरजे, कार्तिक दिघोळे, किशोर शेजवळ, नीलेश सुराणा, संतोष गंगावणे, संकेत गवळी, आदित्य मराठे, महिला अध्यक्ष सारिका दराडे, ज्युनियर अध्यक्ष प्राप्ती कुलकर्णी यांना शपथ दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सातपूर परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना गोदावरी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाळासाहेब जाधव, जीवन रायते, गौरव बोडके, लखन कुमावत, लक्ष्मण निकम, हर्षल अहेर, श्याम फर्नांडिस, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर, संतोष गंगावणे, सुरेश खांडबहाले, रवि भारद्वाज, किरण मंडळ, नीलेश सुराणा, स्वप्नील देसाई, अमित पाटील, अक्षय लवंड, जागृती मालुंजकर, जागृती तिवारी आदी उपस्थित होते.