शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘कश्यपी’ प्रकल्पग्रस्त अखेर पालिकेच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:07 IST

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय सेवेतील वयाची अट पाहता, प्रकल्पग्रस्त ही अट पूर्ण करू शकत नसतील तर त्यांच्या वारसांनादेखील ही संधी मिळणार आहे.१९९२ साली महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून पाटबंधारे खात्याच्या मदतीने नाशिक तालुक्यातील धोंडेगाव परिसरात कश्यपी धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला सादर करून शासनाकडून मंजुरीही मिळविली. शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हा प्रशासनाने या धरणासाठी भूसंपादन केले. यावेळी धरणासाठी जमिनी देणाºया शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा रोख स्वरूपात मोबदला देण्याबरोबच महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. या धरणासाठी पाच गावांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असता, त्यातील काहींना महापालिकेने नोकरीत सामावून घेतले. मात्र त्यानंतर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यास टाळाटाळ चालविली होती. या संदर्भात गेल्या २७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शासनाकडून पाठपुरावा करीत असताना त्याला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तीन वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनी प्रकल्पग्रस्त गावातील शेतकºयांनी एकत्र येत धरणाच्या पाण्यात उड्या मारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मोठा तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महापालिका, जिल्हा प्रशासन, पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांच्या बैठका होऊन एका समितीची स्थापना करण्यात आली. या संदर्भात मुंबईत मुख्य सचिवांकडेही बैठका झाल्या.असता, महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यास नकार दिला होता. सदर धरणाचे पाणी महापालिका वापरत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. परंतु शासनाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले होते. मात्र या कामी होत असलेला विलंब पाहता, गेल्या वर्षी प्रकल्पग्रस्तांनी कश्यपी धरणातील पाणी सोडण्यास विरोध दर्शवून धरणाच्या चोहोबाजूंना वेढा दिला होता, त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनी पुन्हा आंदोलनाची तयारी चालविल्यामुळे त्यांना कसेबसे थांबविण्यात आले होते. या संदर्भात ९ आॅगस्ट रोजी राज्याचे मुख्य सचिवांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने दोनच दिवसांपूर्वी या संदर्भातील आदेश काढले असून, त्यात नाशिक महापालिकेने सन १९९२च्या प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्ती धोरणानुसार विस्थापित झालेल्या ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यात यावे, असे म्हटले आहे. महापालिकेच्या नोकर भरतीला जी बंदी घालण्यात आली आहे, ती बंदी ३६ प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्तीपुरता उठविण्यात येत असल्याचेही या आदेशात म्हटले असून, प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील व्यक्ती वयाची अट पूर्ण करीत नसतील तर त्यांच्या वारसांना ती संधी दिली जावी, असेही शासनाने या आदेशात म्हटले असून, ज्या दिवसांपासून शासनाचे आदेश जारी करण्यात आले, त्या दिनांकापासून प्रकल्पग्रस्तांना सेवाविषयक लाभ लागू राहणार असून, या प्रकल्पग्रस्तांना लाभ दिल्यानंतर त्यांना महापालिकेचे कोणतेही अतिरिक्त दायित्व राहणार नाही, असेही शासनाने या आदेशात नमूद केले आहे.असा आहे आदेशराज्याच्या नगरविकास विभागाने दोनच दिवसांपूर्वी या संदर्भातील आदेश काढले असून, त्यात नाशिक महापालिकेने सन १९९२च्या प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्ती धोरणानुसार विस्थापित झालेल्या ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यात यावे, असे म्हटले आहे. महापालिकेच्या नोकरभरतीला जी बंदी घालण्यात आली आहे, ती बंदी ३६ प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्तीपुरता उठविण्यात येत असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. जे प्रकल्पग्रस्त वयात बसत नसतील त्यांच्या वारसांना समावून घेण्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरणWaterपाणी