कारगिल विजयाचा ‘स्पॉट’ नाशकात

By Admin | Updated: August 6, 2015 00:26 IST2015-08-06T00:24:40+5:302015-08-06T00:26:16+5:30

स्पॉट लाइट : सर्कसबरोबरच लाइटचेही प्रदर्शनना

Kargil won the title of 'Spot' | कारगिल विजयाचा ‘स्पॉट’ नाशकात

कारगिल विजयाचा ‘स्पॉट’ नाशकात

शिक : अनेक किलोमीटर उंचीवरील बर्फाळ डोंगरावरून भारतीय लष्करावर हल्ला करणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्यात ज्या स्पॉट लाइटने महत्त्वाची भूमिका बजावली तो स्पॉट लाइट डोंगरे वसतिगृहावर लावण्यात आला असून, तो बघण्यासाठी नाशिककरांची गर्दी होत आहे.
वरून खालच्या भागात हल्ले करणे सोपी गोष्ट असते, तितकीच अवघड गोष्ट असते ती त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे. अशा परिस्थितीत विजय तर सोडाच परंतु आहे ते टिकवणे कठीण बाब असते. परंतु अशा परिस्थितीही कारगिल युद्धात बाजी पलटवणाऱ्या भारतीय लष्कराचे आजही नाव घेतले जाते. त्यातील शहिदांची आठवण ठेवत त्यांना मानवंदना दिली जाते. त्या युद्धात वीर जवानांबरोबरच ज्या निर्जीव वस्तूने मोलाचा सहभाग नोंदवला आणि ज्यामुळे आपण शत्रूवर अचूक मारा करू शकलो त्या स्पॉट लाइटचे आकर्षण आजही कायम आहे.
नाशिकच्या डोंगरे वसतिगृहावर दाखल झालेल्या सर्कसच्या मालकीचा हा स्पॉट लाइट असून सर्कसबरोबरच त्याचेही प्रदर्शन तेथे सुरू आहे. येणाऱ्या बालगोपाळांबरोबरच ज्येष्ठांनाही त्याचे आकर्षण आहे. सर्कस बघायला आलेला प्रत्येक जण या उपकरणाला बघूनच पुढे जातो. (प्रतिनिधी)

Web Title: Kargil won the title of 'Spot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.