कळवण तालुक्यात चार गटांसाठी ३४, तर आठ गणांसाठी ८२ अर्ज दाखल

By Admin | Updated: February 7, 2017 01:38 IST2017-02-07T01:38:15+5:302017-02-07T01:38:34+5:30

अखेरच्या दिवशी झुंबड : अभोणा गट आणि गणातही सर्वाधिक उमेदवारी अर्ज

In Kalwan taluka, 34 forms for four groups and 82 for eight categories | कळवण तालुक्यात चार गटांसाठी ३४, तर आठ गणांसाठी ८२ अर्ज दाखल

कळवण तालुक्यात चार गटांसाठी ३४, तर आठ गणांसाठी ८२ अर्ज दाखल

कळवण : राजकीयदृष्टया अतिशय संवेदनशील असलेल्या कळवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज अखेरीस  पंचायत समितीसाठी ४९ तर जिल्हा परिषदेसाठी १७ अर्ज दाखल झाले. आजअखेर जिल्हा परिषदेसाठी ३४ व पंचायत समिती साठी ८२ उमेदवारी अर्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण डी. यांनी दिली.  आज निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच तहसील कार्यालयात राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गटनिहाय अर्ज मानूर ६, कनाशी ९, अभोणा १०,र खर्डेदिगर ९, चार गटांसाठी एकूण ३४ अर्ज दाखल झाले आहेत.  गणनिहाय अर्ज - मानूर ५, निवाणे १०, अभोणा १८ , नरूळ १० खर्डेदिगर ११, मोकभणंगी १०, कनाशी८, बापखेडा १० असे सर्व मिळून ८ गणांसाठी आज पर्येंत ८१ अर्ज दाखल झाले आहेत. अभोणा गणासाठी सर्वाधिक १८ तर अभोणा गटासाठी सर्वाधिक १० अर्ज दाखल झाले आहेत.  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जि. प सदस्या भारती पवार, माजी सभापती यशवंत गवळी, खासदारपुत्र समीर चव्हाण, माजी जि. प सदस्य जयमाला खांडवी, माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माजी जि प सदस्य हिराजी चौधरी या दिग्गजांनी आज गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी उपसभापती ज्योती जाधव, बाजार समिती संचालक देवेंद्र गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य धवळीबाई दळवी, माजी प स सदस्य अर्जुन बागुल, माजी सरपंच सरूबाई जाधव, कृउबा माजी संचालक विलास गवळी, रायुकॉ तालुकाध्यक्ष प्रवीण रौदळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज बोरसे, कनाशीचे माजी सरपंच विजय शिरसाठ, मनीषा बेनके, पल्लवी देवरे या दिग्गजांनी पंचायत समिती गणासाठी आपापले अर्ज दाखल केलेत.
यावेळी राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांनी पक्षाचा ए. बी. फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निर्धारीत वेळेत जमा केले. मंगळवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत निवडणूक कार्यालयात अर्ज छाननी होणार आहे. (वार्ताहर)
गणनिहाय उमेदवार
खर्डेदिगर - पोपट जगताप (भाजपा ), लालाजी जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस), बाबूंराव पवार ( अपक्ष व शिवसेना ) , रामदास ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), सोमनाथ चौरे ( शिवसेना ), चंद्रकांत गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ), दिलीप बर्डे - अपक्ष , अर्जुन बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस ) , शिवाजी गांगुर्डे ( अपक्ष ) , सुनिल पवार ( माकपा )
मोकभणगी - बेबीलाल पालवी ( भाजपा ), केदा ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ) , पंढरीनाथ भानसी ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), प्रकाश पवार ( भाजप व अपक्ष ), बाळू निकम ( मनसे ), विक्र म पवार ( माकपा ), अनिल सोनवणे ( अपक्ष ), राजेंद्र बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस)
मानूर - मनीषा पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), सीताबाई आहेर ( राष्ट्रीय काँग्रेस ) , वैशाली चव्हाण ( अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस ) कासुबाई माळी ( माकपा ) निवाणे - मीनाक्षी चौरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), उज्वला पवार ( शिवसेना ), अक्काबाई सोनवणे ( अपक्ष ) , यशोदाबाई माळी ( राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष ), सरूबाई जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ) , उषाबाई पवार ( भाजप ), अलका वाघ ( भाजप )
अभोणा गण - चंद्रकला बहीरम ( राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष ) , दिनेश बागुल ( शिवसेना व अपक्ष ), देवेंद्र गायकवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ), राजेंद्र ठाकरे ( भाजपा ) , जगन्नाथ साबळे ( राष्ट्रीय काँग्रेस ) , तुळशीराम गायकवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , मनोहर ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , निलेश गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ) , प्रमोद ठाकरे ( काँग्रेस व अपक्ष ), जयराम ठाकरे -( काँग्रेस ), विलास गवळी ( माकपा )
नरु ळ - प्रीती मेणे ( शिवसेना व अपक्ष ) पल्लवी देवरे ( राष्ट्रीय काँग्रेस), मनीषा देवरे ( राष्ट्रीय काँग्रेस ), लीलाबाई ठाकरे ( भाजपा ) , सुमनबाई पवार ( अपक्ष ), सरलाबाई मोरे ( भाजपा व अपक्ष ), मनीषा बेनके ( माकपा ), सरला देवरे ( राष्ट्रवादी काँग्रेस )
कनाशी- आशा पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), अनुसया बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस), लता गावित ( राष्ट्रीय काँग्रेस), धवळीबाई दळवी ( भाजपा ), इंदिरा पवार ( अपक्ष ), अनुसया बागुल ( अपक्ष ), पुष्पा चव्हाण ( माकपा )
बापखेडा गण - रामदास रौंदळ ( राष्ट्रीय काँग्रेस ), महेंद्र हिरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , प्रवीण रौंदळ ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), मनोज बोरसे ( भाजपा ), वैभव पवार ( शिवसेना ) , प्रभाकर पाटील ( राष्ट्रीय काँग्रेस ), भरत शिंदे ( माकपा), विजय शिरसाठ ( राष्ट्रवादी काँग्रेस ), ज्योती जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस )
गटनिहाय उमेदवार
खर्डेदिगर - जयश्री पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), झेलुबाई ठाकरे (भाजपा ) , जयमाला खांडवी ( अपक्ष व भाजप ) , मिराबाई पवार ( शिवसेना ), लता बर्डे ( माकपा ) , वंदना बहीरम ( राष्ट्रीय काँग्रेस )
मानूर - भारती पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रंजना पवार (राष्ट्रीय काँग्रेस), बेबीबाई सोनवणे (अपक्ष) , हेमलता पवार (माकपा)
अभोणा - जयश्री पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), यशवंत गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ), सुभाष राऊत ( राष्ट्रवादी काँग्रेस ), जितेंद्र ठाकरे ( भाजपा ) , इंदुमती गवळी ( काँग्रेस ) , भगवान ढुमसे (राष्ट्रवादी काँग्रेस ), निलेश गवळी (काँग्रेस)
कनाशी- काशिनाथ गायकवाड (राष्ट्रीय काँग्रेस), नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), समीर चव्हाण (भाजपा), अंबादास मोहन (अपक्ष), शामकांत मोहन (अपक्ष), बाबुराव कोल्हे (शिवसेना), हिराजी चौधरी (माकपा)

Web Title: In Kalwan taluka, 34 forms for four groups and 82 for eight categories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.