कळवण नगरपंचायत निवडणुकीला येणार पक्षीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:54 PM2020-12-21T23:54:48+5:302020-12-22T00:27:14+5:30

कळवण : येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजपा, मनसे, माकपा या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांनी सोयीचा प्रभाग शोधत प्रभागातच तळ मांडला असून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, कळवण पहिल्या नगरपंचायतीचा कार्यकाळ दि. २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने राज्य सरकारने प्रशासक म्हणून कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांची नियुक्ती केली आहे.

Kalwan Nagar Panchayat elections will be partisan | कळवण नगरपंचायत निवडणुकीला येणार पक्षीय रंग

कळवण नगरपंचायत निवडणुकीला येणार पक्षीय रंग

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय पक्षांकडून तयारी : प्रशासकपदी विकास मीना यांची नियुक्ती

कळवण : येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजपा, मनसे, माकपा या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांनी सोयीचा प्रभाग शोधत प्रभागातच तळ मांडला असून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, कळवण पहिल्या नगरपंचायतीचा कार्यकाळ दि. २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने राज्य सरकारने प्रशासक म्हणून कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांची नियुक्ती केली आहे.

कळवण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.१ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या नगराध्यक्ष सुनीता पगार ह्या बिनविरोध झाल्यामुळे १६ जागांसाठी ७४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजपा ४, काँग्रेस ३, शिवसेना १ व २ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पाच वर्षात नगरपंचायतीला ३ नगराध्यक्ष, १० उपनगराध्यक्ष, ८ स्वीकृत नगरसेवक व ३ मुख्याधिकारी लाभले. येत्या जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासक म्हणून मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून नगराध्यक्षाची निवड होईपर्यंत ते कार्यभार सांभाळतील. दरम्यान, कोरोनाच्या सहभाग संदर्भात प्रशासक हे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, विषय समिती सभापती यांच्या सल्लागार समितीशी सल्लामसलत करतील अशी राज्य सरकारची सूचना आहे.
कळवण नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले असून प्रभागानुसार आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण व प्रभागरचनेवर हरकतीची मुदतही दि. २६ नोव्हेंबर रोजी संपली असून नोंदविण्यात आलेली एक हरकत फेटाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदार याद्या घोषित झाल्या असून मतदारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने इच्छुकांची दमछाक होत आहे.

Web Title: Kalwan Nagar Panchayat elections will be partisan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.