शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न पेटण्याची चिन्हेजलवाहिनी योजना मंजूर

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे. या विषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी याप्रश्नी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने ५५ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेला कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी पुनंद प्रकल्पांतर्गत येणाºया कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन या योजनेला विरोध दर्शवण्याची भूमिका भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल त्या सभेत सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध दर्शविणारे ठराव करण्याचे आवाहन केले होते. २६ जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने तालुक्यात अन्य दिवशी ग्रामसभा घेण्यात येऊन जलवाहिनीला विरोध असल्याचे ठराव करण्यात आले. यात सुपले दिगर, काठरे दिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयदर, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद, भांडणे, इन्शी, देसराणे, रवळजी, कोकणीपाडा, मोकभणगी, दरेभणगी, ककाणे, खेडगाव, नाकोडे, पाटविहीर, विसापूर, बिजोरे, नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, बगडू, चाचेर, धनगरपाडा, पिळकोस, खामखेडा, सावकी परिसरातील ४० गावे व वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.तालुक्यात साकारलेल्या अर्जुनसागर (पुनंद) या जलप्रकल्पामध्ये असलेल्या पाण्यावर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा व जनतेचा प्रथम हक्क असल्याने तालुक्यातील पाणी बाहेर जाऊ देण्यास शेतकरी बांधवांनी व जनतेने ग्रामसभांमधून कडाडून विरोध केल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदनाची प्रत पाठवून या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यामुळे सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी योजना संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्जुनसागर (पुनंद )प्रकल्प व त्याअंतर्गत असलेल्या सुळे उजवा व डावा कालवा तसेच सुपले उजवा व डावा कालवा व पोटचारीसाठी शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी हातच्या गेल्या असून त्याचा मोबदला अजूनही पदरात पडलेला नाही. कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी तहानलेला असताना सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवावर अन्याय केला आहे, अशी भावना कळवण तालुक्यातील जनतेतून निर्माण होत आहे.