कळवण येथून मजूर बिहारला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:32 IST2020-05-21T21:55:06+5:302020-05-21T23:32:22+5:30

कळवण : तालुक्यात रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेले बिहार राज्यातील सुमारे ६५ मजूर विशेष बसद्वारे रवाना झाले. बिहारला जायला निघालेल्या मजुरांना निरोप देण्यासाठी प्रशासन बसस्थानकात हजर होते. बस रवाना होताना तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी बाय करताच मजुरांनी हात देऊन अभिवादन करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

 From Kalvan, the laborer left for Bihar | कळवण येथून मजूर बिहारला रवाना

कळवण येथून मजूर बिहारला रवाना

कळवण : तालुक्यात रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेले बिहार राज्यातील सुमारे ६५ मजूर विशेष बसद्वारे रवाना झाले. बिहारला जायला निघालेल्या मजुरांना निरोप देण्यासाठी प्रशासन बसस्थानकात हजर होते. बस रवाना होताना तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी बाय करताच मजुरांनी हात देऊन अभिवादन करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
कळवण शहर व तालुक्यात रोजगारानिमित्त आलेली अनेक बिहारी कुटुंबे राहतात. काही जण एकटेच राहतात. रंगकाम, बांधकाम मजूर, हॉटेल्स यासह विविध ठिकाणी हे मजूर काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून परराज्यातील अनेक मजूर कळवण शहरात वास्तव्यास आहेत. सध्या कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाउन आणि त्यामुळे रोजगार नसल्याने भासत असलेली आर्थिक चणचण यामुळे या मजुरांचे मोठे हाल होत होते. परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची ओढ लागली असली तरी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, डॉ. व्यंकटेश तुप्ते, हेमंत पगार, डॉ.राजेश काटे, डॉ.प्रीतम आहेर, मंडल अधिकारी एम.के. गांगुर्डे, एम. एस. बागुल, तलाठी आर. एल. हिरे, व्ही.के.गांगुर्डे उपस्थित होते.
------------------------------
घरातली एखादी व्यक्ती प्रवासाला जात असेल तर कुटुंब त्याला निरोप द्यायला येते. बिहारला जायला निघालेल्या मजुरांना निरोप देण्यासाठी प्रशासन बसस्थानकात हजर होते. बस रवाना होताना तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी बाय करताच मजुरांनी हात देऊन अभिवादन करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Web Title:  From Kalvan, the laborer left for Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक