कळवण रुग्णालयाने पटकावले विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:46 IST2021-02-08T19:30:59+5:302021-02-09T00:46:14+5:30
कळवण : जिल्हा रुग्णालय आयोजित क्रिकेट स्पर्धेत कळवण उपजिल्हा रुग्णालय संघ प्रथम विजेता ठरला. या स्पर्धेत जिल्ह्यातील २० संघ सहभागी झाले होते.

कळवण रुग्णालयाने पटकावले विजेतेपद
नाशिकच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. पहिल्या दिवशी १० सामने झाले. त्यातील विजेत्या १० संघांचे दुसऱ्या दिवशी ५ सामने झाले. ५ संघातून उपांत्य फेरीसाठी २ सामने झाले. यात कळवण उपजिल्हा रुग्णालय संघाला ५ सामने खेळावे लागले. पहिला सामना हा नाशिक जिल्हा रुग्णालय (ब) संघासोबत झाला तर दुसरा सामना उपजिल्हा रुग्णालय मनमाड संघासोबत झाला. तिसरा सामना संदर्भ सेवा रुग्णालय वॉर्ड बॉय संघासोबत करून उपांत्य फेरीसाठी बाजी मारली तर उपांत्य फेरीत जिल्हा रुग्णालय (अ) संघासोबतही विजय मिळविला. कळवण उपजिल्हा रुग्णालय संघ व जिल्हा रुग्णालय ब्रदर संघ या संघासोबत अंतिम सामना होऊन उपजिल्हा रुग्णालय विजेते ठरले. उपजिल्हा रुग्णालय संघाचे कर्णधार किरण शिंदे यांनी अष्टपैलू कामगिरी केल्याने सर्व सामने एकहाती जिंकता आले.