शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:47 IST

रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

ठळक मुद्देशनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठलावृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट रात्री पहावयास मिळतोभारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील

नाशिक : शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिकवन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात सध्या काजव्यांची चमचम अनुभवयास येत आहे. आठवडाभरापासून काजव्यांची उत्पत्ती या भागात झालेली पहावयास मिळत आहे; मात्र रविवारी (दि.९) व सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावल्यामुळे काजव्यांचे प्रमाण घटल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.पुढील आठवडाभर काजवे काही प्रमाणात बघावयास मिळणार असल्याने पर्यटकांना महोत्सवांतर्गत अभयारण्यात सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे; मात्र रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

निसर्गाचा अद्भूत आविष्कार सह्याद्रीच्या कुशीत अभयारण्य क्षेत्रात काहीसा विलंबाने अनुभवयास आला. मागील दोन दिवसांपासून भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी (दि.१०) पर्यटकांची संख्या रोडावलेली होती; मात्र शनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला येथील वृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट अंधा-या रात्री पहावयास मिळतो. काजव्यांच्या आकर्षणापोटी नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगरसह या जिल्ह्यांमधून तसेच गुजरात राज्यांमधील अहमदाबाद, सुरत, राजकोट जिल्ह्यांमधूनही पर्यटक हजेरी लावत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्यक्षेत्रात पाळावयाच्या नियमावलीच्या पत्रकांचे भंडारदरा-मुतखेल, शेंडी-घाटघर नाक्यांवर वाटप करण्यात येत आहे. तसेच या परिसरात जागृतीपर सूचना फलकही उभारण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या टवाळखोरांसह हौशी हुल्लडबाजांवर कारवाईचे आदेश दिल्याचे अंजनकर यांनी सांगितले. याबाबत राजूर पोलीस निरीक्षकांसह अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही पत्र वन्यजीव विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी काजव्यांचा सुरक्षित अंतरावरून आनंद लुटावा, काजवे पकडण्याचा किंवा ज्या झाडांवर काजवे चमकत आहे, त्या झाडांवर माती, दगड आदी वस्तू फेकण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, अन्यथा साध्या वेशातील स्वयंसेवकांद्वारे संबंधित पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक गस्ती पथकाला कळवून त्यांच्यावर दंडात्मक तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या नियमांचे करावे काटेकोर पालन

  • रात्री ९ वाजेपूर्वी अभयारण्यात प्रवेश करावा.
  • रात्री १२ वाजेच्या अगोदर अभयारण्य क्षेत्र तत्काळ सोडावे.
  • अभयारण्यातील मुख्य रस्ता सोडून वृक्षराजीमध्ये जाणे टाळावे.
  • अभयारण्य क्षेत्रात वावरत आहोत, याचे भान ठेवावे, जेणेकरून वन्यप्राण्यांकडून कोणालाही दुखापत होणार नाही.
  • झाडांपासून सुरक्षित अंतरावर थांबून काजव्यांचे निरीक्षण करावे.
  • काजव्यांना धोका होईल असे वर्तन करू नये.
  • अभयारण्यात येताच वाहनांचे दिवे मंद ठेवावे.
  • अनावश्यकरीत्या हॉर्नचा वापर करू नये.
  • स्वत:जवळ ज्वलनशील पदार्थ बाळगू नये.
  • वनविभाग व पोलीस गस्त पथकाला सहकार्य करावे. 
टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवtourismपर्यटन