त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:19 IST2019-12-22T21:39:01+5:302019-12-23T00:19:31+5:30

त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर खासगी कामासाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपविला आहे.

Kailas Chotha, who is in charge of Trimbak City Council | त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे

त्र्यंबकेश्वरच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना पुरुषोत्तम लोहगावकर. समवेत समीर पाटणकर, स्वप्नील शेलार, दीपक गिते, सायली शिखरे, अनिता बागुल, शिल्पा रामायणे आदी.

ठळक मुद्देनगर परिषदेत औपचारिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर खासगी कामासाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपविला आहे.
त्र्यंबक नगर परिषदेत पदभार स्वीकारण्याच्या औपचारिक
कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भाजप ज्येष्ठ नेते विजय शिखरे, गटनेता मंगला आराधी, भाजप सरचिटणीस माधव भुजंग, आरोग्य सभापती माधवी भुजंग, बांधकाम सभापती सायली शिखरे, शीतल उगले, शिल्पा रामायणे, त्रिवेणी तुंगार, भारती बदादे, संगीता भांगरे, विष्णू दोबाडे, पप्पू शेलार, सागर उजे, अनिता बागुल, अशोक घागरे, दीपक लोणारी, नगरसेवक श्याम गंगापुत्र, श्रीकांत गायधनी आदी उपस्थित होते. यावेळी चोथे यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रभारी नगराध्यक्ष चोथे यांची शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kailas Chotha, who is in charge of Trimbak City Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mayorमहापौर