कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:52 IST2019-01-19T12:51:56+5:302019-01-19T12:52:04+5:30

सायखेडा : नाशिक ,औरंगाबाद महामार्गावर निफाड शहरालगत असलेल्या कादवा नदीच्या पुलावरून माल वाहतूक करणारा ट्रक शुक्र वारी मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रक कोसळून चालक ठार झाला.

Kadwa river bed crashed driver dead | कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार

कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार

सायखेडा : नाशिक ,औरंगाबाद महामार्गावर निफाड शहरालगत असलेल्या कादवा नदीच्या पुलावरून माल वाहतूक करणारा ट्रक शुक्र वारी मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रक कोसळून चालक ठार झाला. नाशिकहुन निफाडकडे येणारा ट्रक अचानक कोसळला प्रचंड आवाज झाल्याने परिसरात मोठा अपघात झाल्याचा अंदाज प्रथम परिसरातील नागरिकांना आला. महामार्गावर कादवा नदीवर जुना व नवा असे एकाच ठिकाणी दोन पूल आहे येणारी आणि जाणारी वाहतूक वेगवेगळ्या पुलावरून येत जा करत असल्याने या ठिकाणी फारशी वाहतूक कोंडी होत नाही तरी रात्री पुलाचा अंदाज आला नसल्याने किंवा चालकाचा ताबा सुटल्याने अचानक ट्रक पुलाच्या खाली ४० फूट कोसळली. ट्रकमध्ये किती माणसे होती क्लिनर अथवा इतर कोणी होते का याचा तपास सुरू आहे. मध्यरात्री घटना घडल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. सकाळी बघ्यांची गर्दी जमल्याने पोलिसांनी बॅरिगेट लावून वाहतूक सुरळीत चालू केली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून लवकरात लवकर ट्रक बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Kadwa river bed crashed driver dead

टॅग्स :Nashikनाशिक