ओझर टाउनशिप येथे कबड्डी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:27 IST2019-02-10T21:30:00+5:302019-02-11T00:27:42+5:30
ओझर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारपासून सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील एकूण एकवीस संघांनी सहभाग घेत आपला खेळ दाखविला.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने ओझर टाउनशिप येथे नाशिक ग्रामीण पोलीस विरु द्ध क्र ीडा प्रबोधिनी दरम्यान रंगलेल्या उपांत्य कबड्डी सामन्याचा रोमांचक क्षण.
ओझर : येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारपासून सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील एकूण एकवीस संघांनी सहभाग घेत आपला खेळ दाखविला. रविवारी सायंकाळपर्यंत उपांत्य सामन्यात नाशिक ग्रामीण पोलीस व क्रीडा प्रबोधिनी यांच्यात तर साई सिडको आणि ब्रह्मा आडगाव यांच्यात सामना झाला होता, त्यात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा क्रीडा प्रबोधिनी व ब्रह्मा आडगाव संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. क्र ीडा प्रबोधिनी व ब्रह्मा संघ नावाजलेले संघ म्हणून ओळखले जातात.