शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे आॅनलाइन शिक्षक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 4:55 PM

चांदोरी : के. के. वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्र म झूम अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देप्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन

चांदोरी : के. के. वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्र म झूम अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिक्षकाची भूमिका जबाबदारीची व महत्वाची असल्याचे सांगितले पुढे ते म्हणाले शिक्षकांनी नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडविले पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा, प्रेरणा देणारा शिक्षक हा आदर्शवत असतो. म्हणून शिक्षकाला महत्व आहे. यासाठी शिक्षक चरित्रवान, शीलवान असला पाहिजे. असे शिक्षक विद्यार्थ्यांचे लाडके बनतात. त्यादृष्टीने शिक्षकांनी कार्य केले पाहिजे असे डॉ. दातीर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.या वेळी कला विभाग प्रमुख डॉ. हनुमंत वाघमारे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रवीण आहेर यांनी शिक्षकाविषयी आपले अनुभव कथन केले. कार्यक्र माचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. डी. एन. दुर्गेष्ट, प्रा. नितीन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका गुंडगळ यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा. बी. बी कोल्हे, कोकाटे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्र मास महाविद्यालयातील ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्या सत्रात विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले. त्यातून उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विजेत्या विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले. (०५ चांदोरी)

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी