दलित समाजाला न्याय द्यावा
By Admin | Updated: May 9, 2014 23:44 IST2014-05-09T22:48:14+5:302014-05-09T23:44:35+5:30
रिपाइंची मागणी : जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन

दलित समाजाला न्याय द्यावा
रिपाइंची मागणी : जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
सातपूर : अहमदनगर जिल्ातील सोनाई गावात झालेल्या दलित विद्यार्थ्याच्या हत्त्येचा तपास लवकरात लवकर करावा व हत्त्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा करून दलित समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रिपाइंने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नगर जिल्ात नितीन आगे या दलित विद्यार्थ्याची हत्त्या करण्यात आली आहे. एकट्या नगर जिल्ात एकूण ११२ घटना दलित अत्याचाराच्या घडल्या आहेत, तर राज्यात किती घटना घडल्या असतील? काही समाजकंटक आणि सत्ताधारी राजकारणी त्यांना पाठीशी घालायचे काम करीत आहेत. ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. त्यामुळे देशात जातीय वादाचे वादळ पसरत चालले आहे. सोनाई हत्त्याकांडाचा अजून तपास पूर्ण झालेला नाही. या हत्त्या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा करून दलित समाजाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा या निवेदनाद्वारे रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, शहर अध्यक्ष पवन क्षीरसागर, अमोल पगारे, दीपक डोके, माधुरी भोळे, प्रीती भालेराव, बबन भुजबळ, भरत खेडकर, समाधान जगताप, गौरव जाधव, रोहित जगताप आदि कार्यकर्त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)