लोकमत न्यूज नेटवर्क नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली. त्यामुळे कर्जासह कॅन्सरग्रस्त सासू, वृद्ध सासरा आणि अडीच महिन्याचा मुलगा सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. शेतीवरच्या कर्जामुळे सर्व जीविताचे मार्गबंद झाले असून, शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर पतीनंतर आपल्यासमोरही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी व्यथा शिवसेना कृषी अधिवेशनात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांची परिस्थिती मांडताना सटाण्यातील राहूरच्या कल्याणी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. कर्जाच्या डोंगरामुळे आणि नापिक ीने लग्नानंतर अवघ्या तेरा महिन्यांत सौभाग्य हरपल्यानंतर या धक्क्यातून सावरताना सासू, सासरे, अडीच महिन्याचा मुलगा आणि लग्नाला आलेली नणंद असे कुटुंब सांभाळताना होणारी परवड सांगताना ठाकरे गहिवरल्या. पतीच्या आत्महत्येनंतरीही कर्जाचा डोंगर सातत्याने वाढताच आहे, त्यामुळे शेती करणेही कठीण झाले आहे. कर्जमाफी मिळाली नाही, तर जगणे अशक्य झाले आहे. सरकार पैसे नसल्याचे सांगत कर्जमाफी देण्याचे टाळत आहे. स्वच्छ भारतसारख्या योजनांच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी चित्रपटांना सवलती देण्यासाठी पैसा खर्च होत असताना माझ्यासारख्या विधवांवर आत्महत्येची वेळ का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
अवघ्या ४१२ दिवसांचे सौभाग्य
By admin | Updated: May 20, 2017 01:39 IST