सापाच्या जोडीला तरुणांकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:01 IST2019-06-15T22:24:03+5:302019-06-16T01:01:06+5:30
सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले.

सापाच्या जोडीला तरुणांकडून जीवदान
वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. राकेश आनप यांच्या घरापासून थोड्या अंतरावर धामण जातीच्या सापाची जोडी जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तत्काळ दीपक वेलजाळी व राकेश आनप यांनी मोठ्या हिमतीने या जोडीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या लांबीचे साप असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते.
वेलजाळी व आनप या तरुणांच्या मदतीने दोन्ही सापांना जिवंत पकडून निसार्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. गेल्या महिन्यात पक्षीप्रेमी वेलजाळी यांनी कुत्र्याच्या तावडीतून मोराला जीवदान दिले होते.
आता सापाच्या जोडीला जीवदान दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी अमोल आनप, अनिल आनप, लक्ष्मण नवले, वैभव वेलजाळी, पिंपळवाडी माजी उपसरपंच विजय गुरुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.