शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेसाठी चार टक्क्यांपर्यंत तरतूद हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:54 IST

अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.

नाशिक : अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे.भारतात पंधरा हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. विदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे. न्यायाधीश, न्यायालयांच्या अपुऱ्या संख्येमुळे खटल्यांचा निपटारा होण्यास देशात विलंब लागतो. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेला अधिकाधिक सोयी-सुविधा पुरवून बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून दोन ते चार टक्क्यांपर्यंत तरतूद होणे गरजेचे असल्याचे मत शहरातील विधीज्ञांनी व्यक्त केले....तर वाढेल न्यायाधीशांची संख्यातरतूद अत्यल्प असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेची आहे. दहा लाख लोकांमागे ५० न्यायाधीश असावे, असा ठराव झाला आहे. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेवर १० टक्के खर्च करावा, अशी घटना सांगते. प्रत्यक्षात आतापर्यंत ०.१९ ते ०.२३ टक्के अशी तरतूद केली जाते. राज्यकर्त्यांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवून त्यासाठी पावले उचलावी.- अ‍ॅड. जयंत जायभावे, माजी अध्यक्ष, महा. गोवा बार कौन्सिलजलदगतीने होईल खटल्यांचा निपटाराअर्थसंकल्पात विधी क्षेत्रासाठी ०.५ टक्के एवढीच तरतूद यापूर्वी केली गेली आहे. ८ टक्क्यांपर्यंत न्यायव्यवस्थेसाठी तरतूद करणे गरजेचे आहे. न्यायाधीशांची कमी संख्या हा संपूर्ण देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. परदेशांमध्ये एक हजार लोकांमागे एक न्यायाधीश आहे, तर भारतात १५ हजारांमागे एक न्यायाधीश आहे. त्यामुळे जलदगतीने खटल्यांचा निपटारा होत नाही. अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे आहे.-अ‍ॅड. अविनाश भिडे, माजी अध्यक्ष, महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलन्यायव्यवस्थेसाठी तरतूद अत्यंत तोकडीन्यायव्यवस्थेमार्फत सरकारला मोठा महसूल मिळतो. देशातन्यायाधीशांची तोकडी संख्या आहे. आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे न्यायाधीशांची संख्या वाढत नाही.अर्थसंक ल्पात दोन टक्क्यांपर्यंत तरतूद असावी. त्याचबरोबर वकिलांसाठी अद्ययावत रिफ्रेशमेंटकोर्सेस सुरू करता येऊ शकेल. तसेच ज्युनिअर वकिलांना मानधन सर्व राज्यांमध्ये सुरू करण्याबाबतही विचार होणेगरजेचे आहे.-अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असो.दोन टक्क्यांपर्यंत तरतूद गरजेचीन्यायालयात खटल्यांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी न्यायालये आणि न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असणे गरजेचे आहे. किमान पावणेदोन ते दोन टक्के इतकी तरतूद झाल्यास मोठा फरक पडेल. न्यायाधीशांची संख्या वाढल्यास जलदगतीने प्रलंबित खटल्यांचा निपटारा होईल.- अजय मिसर, विशेष सरकारी वकीलअर्थसंकल्पात हवी भरीव तरतूदसर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याकडे लक्ष वेधले आहे. येण्याºया अर्थसंकल्पामध्ये सरकारने न्यायव्यवस्थेसाठी सरकारने योग्य ती तरतूद केल्यास न्यायालयाच्या जुन्या इमारतींमध्ये सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा होईल. भौतिक सोयीसुविधांची चणचण भासणार नाही.- अ‍ॅड. विद्या देवरे-निकम, सरकारी वकीलअर्थसंकल्पाकडून अपेक्षा

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक