जोपूळ केंद्राची आॅनलाईन शिक्षण परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 03:08 PM2020-07-30T15:08:51+5:302020-07-30T15:08:51+5:30

जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहचणाऱ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा आढावा घेतला.

Jopul Kendra's online education conference held | जोपूळ केंद्राची आॅनलाईन शिक्षण परिषद संपन्न

जोपूळ केंद्राची आॅनलाईन शिक्षण परिषद संपन्न

Next
ठळक मुद्दे नाशिक शिक्षण हेल्पलाईन नोंदणी कशी करायची याचे प्रात्यिक्षक करून दाखवले.

जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहचणाऱ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा आढावा घेतला.
कुमावत यांनी केंद्रात सुरू असलेल्या आॅनलाईन आणि आॅफलाईन या दोन्ही प्रकारच्या अध्यापनाबाबत माहिती घेऊन शिक्षकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थी व पालकांची भेट घेताना एस एम एस या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करून स्वत:च्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देण्यात येऊन विद्यार्थी शिक्षणाशी, शाळेशी कायम कसा जोडला जाईल याविषयी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जिल्हा शिक्षण अधिकारी वैशाली वीर यांचा मार्गदर्शनपर व्हिडिओ दाखवण्यात आला तसेच सामाजिक व भावनिक आरोग्य या बाबतच्या प्रश्नांवर शिक्षकांनी चर्चा केली.
तांत्रिक सत्रात आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण पद्धती, कोविड फायटर व्हिडीओ दाखवण्यात आला. तंत्रस्नेही शिक्षक अनिल भरीतकर व वैशाली चव्हाण यांनी जिल्ह्यÞातील उल्लेखनीय शाळा आणि शिक्षक यांच्या यशोगाथा व्हिडिओ अन् पीपीटीच्या माध्यमातून शिक्षकांसमोर मांडल्या.
त्यानंतर टेलीग्राम अ‍ॅप डाउनलोड करून नाशिक शिक्षण हेल्पलाईन नोंदणी कशी करायची याचे प्रात्यिक्षक करून दाखवले.

Web Title: Jopul Kendra's online education conference held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.