Jodhamaro agitation in the image of Jai Bhagwan Goyal | जय भगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन
जय भगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन

ठळक मुद्देनाशिकमध्ये जय भगवान गोयल च्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलनप्रहार जनशक्ती पक्षातर्फे  ‘आज का शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदीची मागणी

नाशिक :  ‘आज का शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना कथितरीत्या शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या प्रकरणात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (दि.१३) सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
प्र्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे ‘आज का शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक छापणारे जय भगवान गोयल याच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले, तसेच या  वादग्रस्त पुस्तकावर  बंदी  घालावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आला आहे.दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकाºयांनाही निवेदन देण्यात आले आहे. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी उपजिल्हाप्रमुख अमजद पठान, शहर प्रमुख शाम गोसावी , वैभव देशमुख,  विनायक येवले , ललित पवार ,  प्रकाश कुमावत , सुभाष जगताप , सचिन अमृतकर व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Jodhamaro agitation in the image of Jai Bhagwan Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.