जो जिंदगी सिखा रही है वो किताबों में कहा: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:54 IST2025-05-23T07:54:14+5:302025-05-23T07:54:14+5:30
‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है मंजुरे खुदा होता है,’ असे म्हणत नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

जो जिंदगी सिखा रही है वो किताबों में कहा: छगन भुजबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह माझ्या मंत्रिपदासाठी सकारात्मक होते. परंतु, अनेकांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केल्याने ‘जहां नहीं चैना...’ असे म्हणायची वेळ आली होती. मात्र, गेल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या सांगण्यानुसार अखेर ‘देर आये दुरुस्त आये...’ असे म्हणण्याची वेळ आली असून, ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है मंजुरे खुदा होता है,’ असे म्हणत नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
राजकीय जीवनातील अनुभवांवर भाष्य करताना ‘ख्वाबों में जो देखते हैं वो हकीकत में कहा; जो जिंदगी सिखा रही है वो किताबों में कहा’ हा शेरही त्यांनी सादर केला.
घर सोडण्याचे दु:ख मोठे...
शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर बाहेर पडून नवीन घर बांधले. त्या घराचे बांधकाम करून त्याचा विस्तार केला. परंतु, त्याच घरात आम्हाला त्रास व्हायला लागल्यानंतर आम्ही ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे दु:ख मोठे होते, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.