जेएनयु प्रकरणी नाशिक मध्ये महाविद्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:26 IST2020-01-08T13:24:21+5:302020-01-08T13:26:40+5:30
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली.

जेएनयु प्रकरणी नाशिक मध्ये महाविद्यालय बंद
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली.
जेएनयू प्रकरणी नाशिकमधील छात्र भारती, एआयएसएफ, सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आज महाविद्यालये बंद करण्याचे आवाहन केले होते. सकाळी महाविद्यालये सुरळीत सुरू होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालया व्यवस्थापनाला बंद करण्याची विनंती केली. केटीएचएम महाविद्यालयात मोर्चा काढण्यात आला. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
शहरातील एचपीटी, बीवायके, भोसला, पंचवटी नाशिकरोड येथील बिटको कॉलेजमध्ये उपस्थितीत लक्षणीय घट होती.