उड्डाणपुलासाठी झिरवाळ यांना राष्ट्रवादीचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:25 IST2021-01-05T17:24:30+5:302021-01-05T17:25:47+5:30
पेठ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८चा बायपास पेठ ते भुवन रस्त्यावर उड्डाणपूल मंजूर करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उड्डाणपुलासाठी झिरवाळ यांना राष्ट्रवादीचे साकडे
तालुक्यातील भुवन, हरसूल, आडगाव, धानपाडा, उंब्रद, रानविहीर, खोकरतळे तोंडवळ, कहांडोळपाडा आंध्रुटे ते खरपडी इतर, तसेच त्र्यंबक तालुक्यातील हरसूल शिवारातील ग्रामपंचायत गाव पाडे यांना महामार्ग ओलांडून पेठ शहरात यावे लागणार असल्याने, मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात. याची लगेच दखल घेऊन महामार्ग चालू होण्याआधीच भुयारी मार्ग मंजूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.