शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा
By Suyog.joshi | Updated: November 18, 2023 18:29 IST2023-11-18T18:28:39+5:302023-11-18T18:29:19+5:30
सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्ये तसेच संयोजकांची इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा स्थळाला भेट.

शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा
नाशिक : नाशिकच्या शिवतीर्थावर सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी तसेच संयोजकांनी इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा स्थळाला शनिवारी भेट दिली. यावेळी शेणीत येथे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे ४० एकरवर जागेत नियोजन करण्यात आले आहे. १५० एकर चारही बाजूने गाव खेड्यानी स्वतः होऊन पार्किंग केली आहे.
२१ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता शेणीतला जरांगे पाटील यांची सभा होईल. त्या नंतर ठाणगाव येथील विश्रामगड येथे भेट व तेथेच ११ वाजता सभा होईल. मनोज जरांगे पाटील यांच्या या तिन्ही सभांना गाव खेड्यातील शहरातील सर्व मराठा बांधवानी कुटुंबासह उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी केले.
याप्रसंगी आमदार सरोज आहेर, सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक चंद्रकांत बनकर, करन गायकर,प्रवक्ते राम खुर्दळ, ॲड. कैलास खांडबहाले,नितीन रोटे पाटील,शरद अण्णा लभडे,ज्ञानेश्वर शिंदे,ॲड. शिवाजी सहाणे,हिरामण वाघ, सागर वाबळे,संदीप खुंटे पाटील,रुपेश नाठे,तानाजी आरोटे,अण्णा पिंपळे,व्यंकटेश मोरे,निलेश ठुबे जण उपस्थित होते.